Wednesday , December 10 2025
Breaking News

पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेला प्रारंभ : 1800 हून अधिक कराटेपटूंनी घेतलाय स्पर्धेत भाग

Spread the love

 

बेळगाव : स्वसंरक्षणासाठी कराटे गरजेचा असून सद्य परिस्थिती पाहता महिला आणि मुलींनी आवर्जून कराटेचे प्रशिक्षण घ्यावे असे केएसपीएस जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमसिद्ध गोंधळे म्हणाले.

बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने आयोजित पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन शिवबसवनगर-बेळगाव येथील केपीटीसीएल सभागृहात करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने अमसिद्ध गोंधळे उपस्थित होते.

उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री भार्गव रेड्डी, कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर अर्जुन भागण्णवर, बेम्को हाईड्राॅलिक्स ,बेळगाव जनरल मॅनेजर सतीश नाईक, बेळगाव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे
अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, उपाध्यक्ष रमेश अलगुडेकर, जनरल सेक्रेटरी जितेंद्र काकतीकर, खजिनदार दिपक काकतीकर होते.
प्रारंभी जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि राष्ट्रीय पंच जितेंद्र कार्तिकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्पर्धेचा उद्देश कथन केला असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर तसेच रमेश अलगुडेकर व दीपक काकतीकर यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ईशस्तवन पर भरतनाट्यम नृत्य सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. उद्घाटक आमसिद्ध गोंधळे यांच्या भाषणानंतर अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आणि अथलेट कमिशन केआयओचे उपाध्यक्ष भार्गव रेड्डी जे व सतीश नाईक यांची समायोजित भाषणे झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली. सुनिता देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेत सुमारे 1870 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कराटे प्रशिक्षक परशुराम काकती, विठ्ठल भोजगार प्रभाकर किल्लेकर, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार, अक्षय परमोजी, नताशा अष्टेकर, परशराम नेकनार, विनायक दंडकर, लक्ष्मीकांत आनंदाचे, राजु राजपुत, चंदन जोशी, मल्लिकार्जुन नडुगेरी, अमित वेसणे, भरमानी पाटील, दीपिका भोजगार, प्रमोद इळिगेर यासह अन्य असोसिएशनचे सदस्य प्रयत्नशील आहेत.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *