
बेळगाव : सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी गंगापुरी महाराज मठ, कोरे गल्ली शहापूर या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर श्री. माधव प्रभू तसेच केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल रक्तविभागाचे डॉक्टर उपस्थित होते. त्याचबरोबर कोरे गल्ली पंच मंडळातील सर्व पंचमंडळ, जीवनविद्या मिशन संस्थेचे पदाधिकारी, प्रबोधक, प्रवचनकार व नामधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. माधव प्रभू यांनी रक्तदाना विषयी समाजात असणारे समज गैरसमज यावर मार्गदर्शन केले. तसेच रक्तदानाचे महत्व यावर मार्गदर्शन करून सर्वांनी रक्तदान करावे व समाजासाठी उपयोगी पडावे असे आवाहन केले.

यावेळी 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. माधव प्रभू यांनी जीवनविद्या मिशनच्या या समाजपयोगी कार्याचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक युवा, महिला कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. श्री महेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर ज्योतिबा हुरुडे यांनी आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta