
बेळगाव : चेक बाऊन्स फसवणूक प्रकरणात दोषी ठरलेले शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव यांच्या वतीने आरपीडी सर्कलमध्ये रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी अभाविप कार्यकर्ते रोहित यांनी सांगितले की, शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या विरोधात चेक बाऊन्स प्रकरणी पीपल्स कोर्टाने मंत्र्याना 6 कोटी 96 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास 6 महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 6 कोटी, 96 लाख, 60 हजार रुपये मधू बंगारप्पा यांनी फिर्यादी राजेश एक्सपोर्टस यांना भरावेत. उर्वरित 10,000 रुपये दंड म्हणून शासनाला द्यावेत, असे सुचविले असले तरी राज्य सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आणखी एका कार्यकर्त्याने सांगितले की मधु बंगारप्पा हे त्यांनी स्थापन केलेल्या आकाश ऑडिओचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्या संस्थेकडून राजेश एक्स्पोर्ट्सला 6 कोटी 96 लाख 60 हजार रु. द्यायला हवे होते. मधु बंगारप्पा यांनी अनेक दिवसांपासून थकीत असलेल्या पैशांचा धनादेश दिला होता. पण, वाटला गेला नाही. यामुळे राजेश एक्सपोर्ट्सने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तपास सुरू असलेल्या त्या खटल्याच्या संदर्भात हा निकाल आला आहे. मधु बंगारप्पा यांच्या विरोधात आम्ही राज्यभर आंदोलन करीत आहोत, असा संताप त्यांनी व्यक्त केला. आंदोलनात हिरेमठ, रोहित उमनाबादीमठ, अप्पाण्णा हडपद, मंजू हंचीनमणी, राज्य सहसचिव मनोज पाटील, देवराज, मल्लू पुजारी, दर्शन हेगडे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta