पर्यावरप्रेमी ई-बाइक ग्राहकांना आकर्षण
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव कॉलेज रोड येथील यश ई – स्कूटर्स शोरूममध्ये ॲम्पिअर बाय ग्रीव्हज् कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विक्री शुभारंभ नुकताच पार पडला. बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांच्या हस्ते प्रथम ग्राहक अभिनंदन कोकितकर यांना दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी यश ई- स्कुटरचे संचालक शिवसंत संजय मोरे होते.
ॲम्पिअर बाय ग्रीव्हज्कडून नवनवीन तंत्रज्ञान युक्त दुचाकी बाजारात आणल्या जातात त्यापैकी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली ‘झील’ ही दुचाकी आहे या दुचाकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही दुचाकी लिथियम आयर्न बॅटरीवर चालते. एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटर धावते. गाडीची वेग मर्यादा 55 किलोमीटर प्रतितास आहे. ही दुचाकी ‘घरच्या करंटवरही चार्ज होते’. या गाडीला 1200 व्होल्टची मोटर असून समोर आरामदायी टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहेत. तसेच मागे कॉइल सप्रिंग हायड्रोलिक 2 सस्पेन्शन आहेत. दोन्ही टायर ट्यूबलेस असून गाडीला एलईडी बल्ब आहेत. कार लाईक फीचर असलेली ऑटी थिफ्ट कि असून ऍडव्हान्स डिजिटल स्पीडोमीटर आहे. स्टोरेज व लेग स्पेस मोठी जागा आहे. आकर्षक 4 रंगांमध्ये उपलब्ध असून प्रति किलो मीटरला 15 पैशापेक्षा इतका कमी खर्च येतो. सदर ही दुचाकी यश ऑटोच्या दालनात उपलब्ध असून बुकिंग चालू आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी प्रसिद्ध वास्तूविशारद एम. वाय. घाडी, ईश्वर लगाडे, सारंग ऑटोचे संचालक संदीप तरळे, व्यवस्थापक नागेश ढेगसकर, अजित मोरे, विनायक मोरे, प्रसाद दंडगे, सोमनाथ मालाई, अनिल सालगुडे व कर्मचारी उपस्थित होते.