
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 28, 29 व 30 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्राथमिक विभाग स्नेहसंमेलन दि. 28 डिसेंबर रोजी बालवाडी ते 3री इयत्तांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्यातील उपक्रमाशील शिक्षक श्री. मोहन पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख रुपाली हळदणकर यांनी करून दिली.. प्रास्ताविक गजानन सावंत व स्वागत अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षण संयोजक नीला आपटे, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर व विद्यार्थी प्रतिनिधी सृजन माने उपस्थित होते. श्री. मोहन पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मोहन पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले.. सुत्रसंचलन सविता पवार यांनी केले. आभार सीमा कंग्राळकर यांनी मानले.
माध्यमिक विभाग स्नेहसंमेलन दि. 29 डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. या संमेलनाला प्रमुख पाहुणी म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी शिवानी गायकवाड उपस्थित होती… यावेळी व्यासपीठावर द. म. शि मंडळाचे उपाध्यक्ष ॲड राजाभाऊ पाटील, श्री. सुभाष ओऊळकर, प्रा. विक्रम पाटील, नीला आपटे, नारायण उडकेकर, गजानन सावंत व विद्यार्थी प्रतिनिधी प्रियल चौगुले उपस्थित होती.
पाहुण्यांची ओळख इंद्रजित मोरे यांनी करून दिली. प्रास्ताविक नारायण उडकेकर व स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. शिवानी गायकवाड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. सुत्रसंचलन मुक्ता आलगोंडी व आभार श्रुती बेळगावकर यांनी व्यक्त केले.
संत ते महात्मे प्रबोधनात्मक कार्यक्रम- दि. 30 डिसेंबर रोजी मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी संत ते महात्मे या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये संत तुकाराम, महात्मा फुले व महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाचे लेखन व संयोजन शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे यांनी केले होते. तर नाट्यीकरणाचे दिग्दर्शन शाळेचा माजी विद्यार्थी शिवराज चव्हाण यांनी केले. संत तुकारामांचे प्रबोधनात्मक अभंग आणि त्या विचारांचा फुले व गांधीजींनी केलेला अवलंब व प्रसार हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीदादा कागणीकर, ॲड. राजाभाऊ पाटील, संस्थेचे सचिव विक्रम पाटील, डॉ. पी. डी. काळे उपस्थित होते. यावेळी शिवाजी दादा कागणीकर यांच्या हस्ते इयत्ता 10 वी चे गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमांमध्ये शाळेचे शिक्षक भारती शिराळे, रेणु सुळकर, रूपाली हळदणकर, वरदा देसाई, मुक्ता अलगोंडी, जयश्री पाटील, शाहीन शेख यांनी सहभाग घेतला. सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी संगीत साथ दिली आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सुत्रसंचलन बी. बी. शिंदे यांनी केले.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे श्री. बी. जी. पाटील, श्रुती क्वाड्रंट, लता नगरे व सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले..
Belgaum Varta Belgaum Varta