Wednesday , March 4 2026
Breaking News

तालुका समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : पहिल्या स्त्री शिक्षिका, आद्य समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः आपल्या पत्नीला शिक्षण देऊन नंतर समाजामध्ये पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढून या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षिका म्हणून रुजू केले होते. तेव्हापासून स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली,यामुळेच आज समाजामध्ये महिलांना सर्वोच्च पदापर्यंत नेण्यासाठी स्त्री शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे, यावेळी सावित्रीबाईंना नमन करणे हे आद्य गरजेचे आहे, असे विचार माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी केले.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात बुधवार दिनांक ३ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मनोहर संताजी आणि प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी केले.

यावेळी बि. डी. मोहनगेकर, दीपक पावशे, मनोहर संताजी, सदाशिव बापट, हरी पाटील, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *