
बेळगाव : रविवारी सकाळी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेची तयारी करण्यासाठी आनंदवाडी आखाड्यात माजी विधानपरिषद सदस्य माननीय श्री. महांतेश कवटगीमठ, गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारूती घाडी, डॉ. गणपत पाटील, स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या उपस्थितीत आखाड्याचे पुजन करून मुहूर्तमेढ करण्यात आली व आखाड्यात मंडप, मैदानाचे सपाटीकरण, महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र विभाग, महिला, व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला व त्याची तयारी सुरू करण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष मारूती घाडी व उपाध्यक्ष नवरत्नसिंग पनवार, कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, तांत्रिक कमिटी अध्यक्ष पै अतुल शिरोले, खजिनदार भरमा पुणुजीगौडा. मनोज बिर्जे, शेखर पाटील, सुहास हुद्दार, भोमेश बिर्जे, अशोक हलगेकर, वैभव खाडे, महादेव पाटील, दुंडेश नाईक, सुनिल सानब, भावेश बिर्जे, माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई आदी उपस्थित होते आगामी 13 आणि 14 जानेवारी रोजी कुस्ती मैदान होणार आहे
Belgaum Varta Belgaum Varta