Wednesday , March 4 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२४ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत.
ही स्पर्धा येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे होणार आहे.
ही स्पर्धा सीमाभाग मर्यादित असून तीन विभागात होणार आहे.
१) प्राथमिक विभाग इयत्ता ३ री ते ७ वी पर्यंत,
२) माध्यमिक विभाग ८ वी ते १० वी पर्यंत
३) महाविद्यालयीन विभाग (सीमाभाग व्यतिरिक्त आंतरराज्यीय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात) इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर (वयवर्षे २६ पर्यंत)
सामान्यज्ञान, शिवकालीन इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमाप्रश्न या विषयावर आधारित सदर स्पर्धा होणार आहे.
विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी झालेबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख ४/२/२०२४ असून स्पर्धकांनी नावनोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे स्पर्धा प्रमुख सिद्धार्थ चौगुले 7338097882, इंद्रजित धामणेकर
9886484332, प्रतीक पाटील 7338145673, आशिष कोचेरी 9886103373 यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी बेळगाव येथे संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *