
बेळगाव : महिनाभरापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपल्या अध्यादेशात काही बदल व शिथिलता आणून जी आरोग्य योजना महाराष्ट्रात रुग्णांना लागू होती, ती आरोग्य योजना सीमाभागातील ८६५ खेड्यातील जनतेलाही लागू करण्यात आली. खासदार मान. धैर्यशील माने व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन याची संपूर्ण माहिती सीमावासीयांना दिली. त्याप्रमाणे समिती कार्यकर्ते कामाला लागले व त्यांनी यासाठी संपर्क कार्यालये अनुक्रमे खडक गल्ली, रंगुबाई भोसले पॅलेस, सिद्धीविनायक मंदिर गोवावेस व विठ्ठलदेव गल्ली शहापूर येथे सुरू झाल्याचे घोषित केले. तसेच ग्रामीण व खानापूर या ठिकाणी संपर्क करण्यासाठी काही मोबाईल नंबर नागरिकांच्या सोयीसाठी दिले. पण याचा पोटशूळ येथील काही उपटसूंभ कानडी संघटनांना सुरू झाला असून रुग्णांना वैद्यकीय मदत मिळू नये यावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी ते करत आहेत, पोलिसही कानडी संघटनांच्या या दबावाला बळी पडत असून खडक गल्ली येथील संपर्क कार्यालयात जाऊन आनंद आपटेकर यांची पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते, तर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांना पोलिसांचे फोन येत असून वैद्यकीय योजनेचे कार्यालय खानापुरात कुठे आहे, कुठली कागदपत्र आपण जमा करत आहात किंवा किती मदत देणार, किती अर्ज आलेत याबद्दल चौकशी करत आहेत, वैद्यकीयसारख्या संवेदनशील विषयातही राजकारण आणणे किंवा खोडा घालणारे प्रकार काही कन्नडिग करत असल्याचे एकूण या प्रकारावरून दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta