
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर हॉकी इंडिया व हॉकी कर्नाटक यांच्या मान्यतेने हॉकी बेळगांव आयोजित मुला-मुलींच्या आंतरशालेय गटात सेंट जॉन काकती, व एम आर भंडारी व आंतर महाविद्यालयीन गटात गोगटे कॉलेज व संगोळी रायण्णा कॉलेज यांनी विजेतेपद कॉलेज यांनी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू सागर बाबली गोगटे कॉलेज, आयेशा शेख ताराराणी स्कूल खानापूर, खुषी गुरव गोगटे कॉलेज, प्रवीण जट्टण्णावर एम आर भंडारी स्कूल यांना देण्यात आले.
माध्यमिक मुलींच्या गटातील शेवटच्या साखळी सामन्यात सेंट जॉन काकती शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 1-0 असा पराभव केला विजय संघाच्या आदिती येतोजीने एक गोल केला. मुलांच्या गटात एम आर भंडारी शाळेने व्ही एम शानभाग शाळेचा 3-0 असा पराभव केला विजयी संघाच्या प्रवीण जट्टण्णावरने 3 गोल केले.
महाविद्यालयीन मुलींच्या गटातील सामन्यात गोगटे कॉलेजने आर पी डी कॉलेजचा 2-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या प्राजक्ता निलजकरने 2 गोल केले.
मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संगोळी रायण्णा कॉलेजने गोगटे कॉलेजचा 3-2 असा पराभव केला, विजयी संघाच्या बाबुलकुमार काळोजीने 3 गोल तर गोगटेतर्फे सागर बाबलीने 2 गोल केले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हॉकी बेळगावचे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, विनोद पाटील, सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, राजेंद्र पाटील, श्रीकांत आजगांवकर, अश्विनी बस्तवाडकर, दत्तात्रय जाधव, प्रकाश कालकुंदीकर, आशा होसमनी, सविता हेब्बार, मनोहर पाटील, विकास कलघटगी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta