Wednesday , April 9 2025
Breaking News

लॉज कर्मचारी मृत्यूप्रकरणी बेळगावातील दोघांना अटक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेरील हॉटेल गोल्डन स्टार लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पायरीवरून उतरताना तोल जाऊन पडल्याने कर्मचारी किरण गणपती भिर्डेकर (रा.भीमनगर तिसरी गल्ली,निपाणी) याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बाळाप्पा गुडगेनहट्टी (वय २५ रा. जोडीहाळ, बंबरगा ता. बेळगाव) व नितेश कित्तुर (वय २८ रा. वैभवनगर, बेळगाव) या दोघांना शहर पोलिसांनी अटक करून त्यांची बेळगावच्या हिंडलगा कारागृहात रवानगी केल्याची माहिती मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांनी दिली.
मयत किरण हा गोल्डन स्टार हॉटेल लॉजवर कर्मचारी म्हणून सेवेत होता. याप्रकरणी शनिवारी (ता.१३) शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून वरील दोघांना किरण याच्या मृत्यूप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी ताब्यातील दोघांनी आपण मोबाईलवर लॉजमधील शूटिंग करीत किरणला ब्लॅकमेलिंग करीत धमकावल्याची कबुली दिली. त्यानुसार किरण यांनी घाबरून लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
त्यानुसार पोलिसांनी वरील दोघांवर भा.दं.वि.कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक करून निपाणी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने वरील दोघांचीही बेळगावच्या हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे‌. पुढील तपास मंडल पोलीस निरीक्षक तळवार हे करीत आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आठ-दहा युवकांच्या टोळक्याकडून प्राणघातक हल्ला…

Spread the love  बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *