
बेळगाव : गोकाक तालुक्यातील खणगाव-देवगौडनहट्टी गावातील सागर उद्दप्पा परसण्णावर या युवकाच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची योग्य चौकशी व्हावी या मागणीसाठी बुद्ध, बसव, आंबेडकर इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेतर्फे बेळगावात आंदोलन करण्यात आले.
बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुद्ध, बसव, आंबेडकर इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. सागर उद्दप्पा परसण्णावर या युवकाच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिसांनी गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी हिट अँड रनचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात यावा, अशी मागणी निदर्शकांनी केली. त्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनाबाबत संघटनेच्या सदस्याने संताप व्यक्त केला की, 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान खणगाव देवगौडनहट्टी गावातील सागर याचा अपघातात मृत्यू झाला. यादिवशी रात्री सागर ऊस पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन कारखान्यात गेला होता. दुसऱ्या दिवशीपर्यंत तो कारखान्यातच असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याशिवाय पोलिसांनी जो वाहन क्रमांक दाखवला आहे तो आणि त्याच्या ट्रॅक्टरचा क्रमांक जुळत नाही. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल आहे असा आरोप करून याची निपक्ष चौकशी करून सागरला व त्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात पोलीस आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप सागर परसन्नवर यांच्या नातेवाईकाने केला. सागरचे वृद्ध आई-वडील न्यायासाठी भटकत आहेत, मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून कारचालक गाडी न थांबवता पळून जात असल्याचे सांगितले. एकंदरीत सागरचा मृत्यू संशयास्पद असून, त्याची योग्य चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पुंडलिक परसन्नावर, रामाप्पा परसन्नावर, नागराज परसन्नावर, मारुती कलगेरी आदी कुटुंबीय तसेच बसव, बुद्ध, आंबेडकर बांधकाम व इतर कामगार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta