Wednesday , March 4 2026
Breaking News

दीपावलीच्या धर्तीवर साजरा करा रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : किरण जाधव यांच्याकडून जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : अयोध्या श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापन्यात आलेल्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याच्या अनुषंगाने अयोध्येसह सारा देश राममय करण्यात आला आहे.
दीपावलीच्या धर्तीवर देशभर भगवान रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळादिन साजरा केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवनगरी सज्ज झाली असून याच अनुषंगाने बेळगाव नगरीतदेखील प्राणप्रतिष्ठादिनी आनंदी आनंद साजरा करण्यासाठी सजविण्यात येत आहे. याकरिता भाजप युवा नेते आणि कर्नाटक राज्य ओबीसी माजी सरचिटणीस किरण जाधव हे बेळगाव शहर परिसरातील सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या भेटीगाठी घेऊन जनजागृती करीत आहेत.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सर्व नियमांचे पालन करीत अभिजीत मुहूर्तावर अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी बेळगाव नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी किरण जाधव हे, सेवाभावी संघ- संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची तसेच बेळगाव शहर परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या चेअरमन, संचालक वर्ग यासह मुख्याध्यापकांची भेट घेत आहेत.

बेळगाव नगरीतील प्रत्येक सेवाभावी संस्थांनी, युवक मंडळांनी आपल्या भागात भगव्या पताका लावून आणि भगवे ध्वज उभारून परिसर राममय करावा तसेच प्राणप्रतिष्ठापनादिनी रामनामाचा जप करावा. शैक्षणिक संस्थानी आपापल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची शालेय परिसरात ‘जय राम श्रीराम जय जय राम’ असा जप करीत हाती भगवे घेऊन प्रभात फेरी काढावी आणि शालेय वर्गातून रामनाम जपासह हनुमान चालीसाचे पठण करावे. शालेय वर्ग भगव्या पताकांनी सजवावेत. विद्यार्थ्यांना रामजन्मभूमी, राम मंदिर उभारणीसाठी झालेले प्रयत्न याची माहिती देतानाच रामायण सांगावे. महिला भगिनींनी आपल्या घरासमोर सडा-रांगोळी घालावी. दरवाजाला तोरण बांधावे, दाराच्या दोन्ही बाजूला दिवे, पणत्या लावाव्यात, जणू दीपावली साजरी करीत आहोत, अशी विनंती वजा आवाहन किरण जाधव हे भेटी गाठी दरम्यान करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *