बेळगाव : रांगोळीतून भव्य दिव्य अशी श्री राम जन्म भूमी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होत आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित म. औरवाडकर यांनी रेखाटलेले बाळराम व वानरसेना तसेच आनंदाने जात असताना खारूताई रामाला फुले टाकत आहेत असे भावचित्रही रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. लेक कलरचा वापर केला असून रेखाटण्यासाठी 5 दिवसाचा कालावधी लागला आहे. एकूण 54 तास लागले आहेत. सदर रांगोळी सर्वांना पहाण्यासाठी खुली आहे वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 8 पर्यंत. ठिकाण ज्योती फोटो स्टुडिओ जवळ राहत्या घरी कलारत्न बंगला वडगाव बेळगाव. येथे दिनांक 21 ते 29 पर्यंत सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले आहे.