
बेळगाव : बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधील राजदीप ट्रेडर्स दुकानासमोर थांबविण्यात आलेल्या दुचाकी वाहनाची डिकी उघडून आतील रोख रक्कम चोरून चोरटा दुसऱ्या दुचाकीवरून फरार झाला आहे. चोरीचे हे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे.
रक्कम चोरीला गेलेल्या व्यापाऱ्याने सांगितले की, एपीएमसीमध्ये माल खरेदीसाठी पैसे घेऊन आलो होतो. दुकानासमोर गाडी लावून आत गेलो तेवढ्यात गाडीची डिकी उघडून पैसे चोरून नेले. सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाली आहे. एपीएमसी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्याचा शोध घेऊन आमचे पैसे मिळवून द्यावेत अशी विनंती त्यांनी केली. यासंबंधी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यातआली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta