बेळगाव : काँग्रेसचे आमदार आणि माजी सभापती रमेशकुमार यांनी विधानसभेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्या विरोधात बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आज सुवर्ण विधानसौध नजिक निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत, रमेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आम. रमेशकुमार यांनी अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्य विधानसभेत केले आहे. त्यांनी ही एका महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. अशावेळी महिलांच्या भावना दुखावणारे अवमानकारक विधान करणे लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे रमेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी केली. त्याचबरोबर रमेश कुमार यांनी केलेल्या त्या विधानाचा भाजप जिल्हा महिला मोर्चाने तीव्र निषेध करण्यात आला. आम. भारती शेट्टी, प्रेमा भंडारी, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत्या.
