प्राथमिक फेरीद्वारे निवडक संघांचा सहभाग
बेळगाव : बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्य परंपरेला चालना देण्यासाठी कॅपिटल वन संस्थेतर्फे सलग बाराव्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी तब्बल १८ संघांचा सहभाग असणारी ही स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. नाट्यरसिकांच्या सोयीसाठी संस्थेने नुकतेक वेळापत्रक जाहीर केले असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने शिवाजीराव हंडे यांनी केले आहे.
बेळगांव परिसरातील रसिकांचे नाट्य कलेवरील प्रेम व वैभवशाली नाट्य परंपरेला सर्वश्रृत आहे परंतु अलीकडे बदलत्या करमणुकीच्या पद्धती, शासकीय धोरणे यामुळे मध्यंतरीच्या काळ नाट्य नाट्यरसिकांना या प्रपंचापासून अलिप्त रहावे लागले. आजवर शेकडो स्पर्धक संघांनी आपल्या कलाविष्कारांने नाट्यरसिकांची दाद मिळाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तिन्ही राज्यातून अनेक दिगज संघ या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवित असतात. संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमुळे काही अंशी नाट्य प्रपंचाला उभारी मिळाली आहे.
बेळगांवकर नाट्यरसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका अनुभवयास मिळाली या हेतूने संस्थेने आभासी तत्वावर निवड प्रक्रिया राबवून दिगज संघांची यामध्ये निवड केली आहे.
एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि. ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दररोज सकाळी १० ते ८ या कालावधीत स्पर्धा होणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या कालावधीत होणार असून त्यानंतर लगेच मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ संपन्न होणार आहे.
*(सदर स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून शिस्तबद्ध आयोजनाचा भाग व स्पर्धक संघांना व्यत्यय होऊ नये यासाठी प्रयोग सुरु असताना नाट्यरसिकांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही)
*(अखिल भारतीय स्थरावरील लेखन स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील दि. ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बक्षिस समारंभामध्येच संपन्न होणार आहे.)