Wednesday , March 4 2026
Breaking News

19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उद्या

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवार (ता. 3) रोजी सकाळी 8-00 वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. 19 व्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व युवा नेते आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती आर. चौगुले या दांपत्यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीळ्ळी हे असणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक अभिजीत सायमोते हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील सर्व ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य गावातील सर्व सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत तेव्हा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *