
बेळगाव : भाग्यनगर परिसरातील सर्वच रस्ते नव्याने करण्यात आले आहेत. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविले नसल्यामुळे भाग्यनगर पाचवा क्रॉस हा अपघाताचा सापळा बनला आहे. मागील सहा महिन्यात 40 हुन अधिक अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून शास्त्रोक्त पद्धतीने स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी ट्विंकल विराल गांधी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
भाग्यनगर येथील सर्व प्रमुख रस्त्यांवर चौक आहेत. भाग्यनगर पाचवा क्रॉस येथे दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची या भागात ये- जा होत असते. बऱ्याच वेळा छोट्या मोठ्या अपघातात अनेकजण जखमी झाले असून वाहनांचे देखील नुकसान झाले आहे अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. याबाबत ट्विंकल विराल गांधी यांनी महानगरपलिकेकडे निवेदन देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दक्षिण विभाग रहदारी पोलिस नियंत्रण ठाण्यात तसेच स्थानिक नगरसेवकाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta