Wednesday , March 4 2026
Breaking News

सांबऱ्याजवळ कार अपघातात महिला ठार, 1 जखमी

Spread the love

 

बेळगाव : सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (क्र. टीएन 75 झेड 1686) शुक्रवारी मध्यरात्री भरधाव वेगाने बेळगावहून सांबऱ्याकडे निघाली होती.
सांबरा गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यावरून सुमारे 70-80 फूट फरफटा.त उलटी पलटी होऊन शेजारील शेतात जाऊन पडली.
परिणामी गाडीतील एक महिला ठार झाली आहे तर अन्य एक जण जखमी झाला आहे. भर वेगात फरफाटात उलटी पलटी होऊन पडल्यामुळे कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघाताची मारीहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *