गोकाक : माजी मंत्री, गोकाकचे भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावात एका कारखान्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कारखाना सुरू करण्यासाठी ॲपेक्स बँकेकडून ४३९ कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची परतफेड न केल्याने बँक व्यवस्थापक राजन्ना मुथशेट्टी यांनी ५ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले होते. या पार्श्वभूमीवर तपास सुरू करणाऱ्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आज चिक्कनंदी गावातील कारखान्यावर छापा टाकून नोंदी तपासल्या.