Friday , October 18 2024
Breaking News

इस्कॉनची 26 वी हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी

Spread the love

 

बेळगाव : सलग 26 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेळगाव येथे हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
“इतिहासात आजवर अनेक क्रांती झाल्या त्या सर्व राजकीय होत्या. मात्र गेल्या अनेक वर्षात जगाच्या विविध भागात आणि भारतातील अनेक शहरात निघणाऱ्या इस्कॉनच्या रथयात्रेने अध्यात्मिक क्रांती केली आहे. पूर्वी फक्त वृद्धांचा समावेश या रथयात्रेत असायचा, मात्र आता हजारो तरुण-तरुणी या महोत्सवात सहभागी होत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे” असे सांगून भक्ती रसामृत स्वामी पुढे म्हणाले की, 10 फेब्रु. रोजी दुपारी एक वा. धर्मवीर संभाजी चौक येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. ती शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी सहा वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळनंद मंदिर, टिळकवाडी येथे पोहोचेल. त्यानंतर तिथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.’
दि. 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळचे कार्यक्रम होणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे ही रथयात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात असेल आणि इस्कॉन बेळगावच्या हजारो भक्तांद्वारेच नव्हे तर देश- परदेशातील आध्यात्मिक विचारसरणीच्या नागरिकांद्वारेही मोठ्या भक्ती आणि उत्साहात मोठ्या संख्येने, मार्गावर मिरवणूक साजरी केली जाईल.
मिरवणुकीच्या केंद्रभागी एक भव्य रथ असेल, ज्यात श्री राधा कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान बसेलेले असतील. त्यांना उत्तम वस्त्रे आणि पुष्पहारांनी सजवले जाईल आणि बेळगावच्या सर्व रहिवाशांना ते दर्शन देतील. अनेक कीर्तन गटांमध्ये इस्कॉनचे भक्त या भाग्यवान शहराच्या रस्त्यांवर नृत्य करताना संगीतमयपणे भगवान कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करतील. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अगदी अमेरिकेसारख्या काही पाश्चात्य देशांमधूनही भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भेट देणाऱ्या भाविकांमध्ये सर्वात उल्लेखनीय म्हणजे इस्कॉनचे काही ज्येष्ठ भक्त – परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज, परमपूज्य चंद्रमौली महाराज, भक्ती चैतन्य सुंदर महाराज, वृंदावन प्रभू आणि परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचा समावेश असेल मिरवणुकीत अनेक सुंदर डायोरामा देखील असतील, ज्यात भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे वर्णन केले जाईल. रंगीबेरंगी कपडे परिधान केलेल्या मुलांचे विविध गट भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करतील.
बैलगाडी स्पर्धेचा एक भाग म्हणून सुंदर सजवलेल्या बैलगाड्या असतील. 50,000 पेक्षा जास्त प्रसाद पॅकेट्सचे सर्व मार्गावर वितरित केले जाईल. इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी लिहिलेल्या भगवद्गीतेवर आधारित विविध भक्ती साहित्याचे अनेक भक्त रस्त्यावर वाटप करतील. मिरवणूक निघताना अनेक शुभचिंतक फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतील आणि इतर अनेकजण भक्तांना पाणी आणि सरबत वाटप करतील.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग भक्तांच्या कलात्मक रांगोळ्यांनी सजविला जाणार आहे. भगवान श्री राधाकृष्णांच्या रथाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण मार्गावर विविध रंगांचे झेंडे लावण्यात येणार आहेत.
इस्कॉन मंदिरामागील मैदानमध्ये सुंदर सजवलेल्या पेन्डाल आणि स्टॉल्ससह अतिशय उत्सवी स्वरूप केलेले आहे. पेंडालमध्ये संध्याकाळी भजन, कीर्तन, भगवान श्री राधाकृष्णाची आरती, लहान मुलांचा कार्यक्रम आणि इस्कॉनच्या ज्येष्ठ भक्तांचे प्रवचनही असेल. याशिवाय, भगवद्गीता प्रदर्शने, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, डायोरामा, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, भक्ती साहित्य आणि मोफत कृष्ण प्रसाद (पूर्ण जेवण) वितरण इत्यादीचे स्टॉल्स असतील.
गो-सेवा स्टॉल हे शेण आणि गोमूत्रावर आधारित अनन्य उत्पादनांच्या श्रेणीसह एक खास वैशिष्ट्य असेल. इस्कॉनचे भक्त भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर एक तास चालणारे नाटकही सादर करतील. दोन्ही दिवस रात्री प्रसाद असेल. यावर्षी रोज रात्री 50,000 पेक्षा जास्त लोक प्रसादाचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. या महोत्सवात एकूण 1,25,000 लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
इस्कॉन बेळगाव मंदिरातील आपल्या दैनंदिन अध्यात्मिक उपक्रमांसोबतच संपूर्ण व्यक्तिमत्व विकास, तणाव व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्याने आयोजित करत असतात. तसेच फूड फॉर लाईफ अंतर्गत आम्ही दर महिन्याला हजारो लोकांना जेवणाचे वाटप करत आहोत. कोविड 19 आणि जिल्ह्यातील पुरामुळे आम्ही अनेक लोकांना आणि पोलिस कर्मचार्‍यांना जेवण वाटप केले आहे. आम्ही जांबोटी येथे आरोग्य केंद्र सुरू केले आहे जे आजूबाजूच्या गावातील गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. बेळगावमध्ये अल्प प्रमाणात गुरुकुल ही आध्यात्मिक शाळा सुरू करण्यात आली आहे.

बेळगावातील सर्व नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या उत्सवात सहभागी होऊन आध्यात्मिक ज्ञान व आनंद अनुभवावा अशी विनंतीही त्यांनी केली. याप्रसंगी रथयात्रा समितीचे अध्यक्ष बालकिशन भट्टड, ज्येष्ठ भक्त एचडी पाठवा, श्री राम दास श्री मदन गोविंद दास, संकर्षण दास, अनंत लाड आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

रथयात्रा तपशील पुढील प्रमाणे
: शनिवार 10 फेब्रु. 1 वा.
धर्मवीर संभाजी चौक येथून आरतीनंतर रथयात्रेस प्रारंभ.

मार्ग:धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्लीतून शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर रोड ब्रिजवरुन एस पी एम रोड, खडे बाजार – शहापूर, नाथ पै सर्कल, बी एम के आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेस येथून इस्कॉन मंदिर.

About Belgaum Varta

Check Also

भामट्याने लांबवली वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी

Spread the love  बेळगाव : केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका भामट्याने वृद्ध महिलेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *