Monday , September 21 2026
Breaking News

विजेचा धक्का लागल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्याचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : मित्राच्या घरचा स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर (वय ४७) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास बसवण कुडची येथे घडली आहे.
कल्लाप्पा हणमण्णावर हे १९९८ पासून हेस्कॉमच्या सेक्शन ३ सबरीजन १ येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. आज आपल्या मित्राच्या घरच्या स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर यांना विजेचा धक्का बसल्याने ते विहिरीत पडले. विजेचा धक्का लागून विहिरीत पडल्यानंतर पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *