Monday , September 21 2026
Breaking News

आशादीप वेल्फेअर सोसायटीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

 

येळ्ळूर : खानापूर येथील दुर्गाम भागातील असोगा येथील गव्हर्मेंट मराठी शाळेतील 84 हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल या शाळेतील मुख्याध्यापक देसाई यांनी सांगितले की, अभियंता हणमंत कुगजी हे बांधकाम व्यवसायाबरोबरच, समाजात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम जोमाने करत आहेत, त्याचबरोबर गेली 30 वर्षे मी या शाळेतील शिक्षक म्हणून काम करताना इतक्या उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य पहिल्यांदाच आशादीप सोसायटीकडून या गावातील विद्यार्थ्यांना मिळाले असे गौरव उद्गार शिक्षक मादार यांनी काढले, तसेच या शाळेतील शिक्षका वैशाली मॅडम यांनी आशादिप सोसायटी विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी आशादीप वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष हणमंत कुगजी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *