
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठा मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व दिगंबर पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून व हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते झाले. श्री. आबासाहेब दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. म. ए. समिती महिला आघाडीचे अध्यक्ष रेणू किल्लेकर, शहर समितीचे उपाध्यक्ष बी. ओ. येतोजी, सी-ए तुकेश पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, किरण मोदगेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मराठा मंदिराचे अध्यक्ष श्री. अप्पासाहेब गुरव आणि आबासाहेब दळवी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
प्राथमिक व माध्यमिक विभागात जवळपास २००० व महाविद्यालयीन सत्रात जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेनंतर उपस्थित शिक्षकवर्गाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे व युवा समितीचे कौतुक करत अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत तसेच मराठी भाषा आणि शाळा वाचवण्यासाठी युवा समितीची धडपड कौतुकास्पद आहे आशा भावना व्यक्त केल्या, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ चौगुले, आशिष कोचेरी, आकाश भेकणे, आनंद पाटील, साईनाथ शिरोडकर, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, विनायक कावळे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, प्रतीक पाटील, निखिल देसाई, ज्योतिबा पाटील, प्रवीण धामणेकर, अक्षय बंबरकर, सौरभ तोंडले, अविनाश चौगुले, रितेश पावले, महेश चौगुले, दत्ता पाटील, अशोक पाटील, विकास भेकणे, शुभम भेकणे आदी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta