
बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू हायस्कूल माध्यमिक शाळेचा स्नेह संमेलन सोहळा 15/02/2024 रोजी पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळ्ळी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषिविले.
प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगांवचे डायरेक्टर श्री. अशोक नाईक, सी.आर पी. संतोष खेमजी, वेदान्त फाउंडेशनचे अधक्ष्य सतिश पाटील, सविता चंदगडकर, एस, एस देसाई, सौ. सुजाता लोखंडे, जे वी परमाज, एच. एस हुली हे प्रमुख पाहुणे होते. तसेच आदर्श मराठी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. पाटील प्रमुख वक्ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. पंडित नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ यांनी प्रास्तविक केले व विकास पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. शाळेला मदत केल्याबद्दल श्री. अशोक नाईक व सर्व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श विद्यार्थी स्वयंम पावले, अश्विनी लोहार व आदर्श क्रीडापटू नितिन पाटील, गणेश कुरूंगी तसेच तालुका, जिल्हा राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
विनायक कंग्राळकर व निरंजन कर्लेकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली व सौ. सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले व विजया पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta