
बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी येथे कार्यकर्त्यांकडून रविवारी दि. 25 रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रथम शिवपूजन करून कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचे महत्व पहुण्यांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम होते, कार्यक्रमास भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे, राजाराम मजुकर, कल्लापा हंडे, महेश पाटील, सुनील बोकडे, गजानन शहापूरकर, रणजीत हावळानाचे, अभिजित मजुकर, रोहित वायचळ, समीर पाटील, विजय ढम, शेखर बोंगळे, रवी पाटील, दीपक गौंदडकर, ओमकार शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta