बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कन्नडीगांच्या संघटनांनी आपला थयथयाट सुरू ठेवला आहे. बुधवारी पुन्हा या संघटनांनी शहरात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. येथील कित्तूर चन्नम्मा चौकात गोंधळ माजवून संघटनेच्या सदस्यांनी निदर्शने केली. तसेच म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी केली. येत्या दि. 31 डिसेंबर रोजी काही संघटनांनी कर्नाटक बंद पुकारला आहे. मात्र, याला अनेक संघटनांकडून विरोध प्रकट झाला आहे. त्यामुळे कन्नड चळवळीचे नेते वाटाळ नागराज यांनी पुन्हा संताप प्रकट केला आहे. म.ए. समितीवर बंदी घालण्यासाठी सरकार मुहूर्त पाहणार आहे का? असा प्रश्र त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच दि. 31 रोजी संपूर्ण राज्यव्यापी बंद यशस्वी करून दाखवू, अशी वल्गना केली आहे. तसेच बंदला विरोध दर्शविणार्या कन्नडीग संघटनांना त्यांनी अपशद्ब वापरून हिणवले आहे.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …