बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनीच फक्त मराठीचा गौरव न करता आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी तिचा गौरव झाला पाहिजे. कारण आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुरेश कांबळे यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनगुती येथे मराठी भाषा गौरव दिन सजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
शाळेच्या सभागृहात झालेल्या झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील हे होते .
प्रारंभी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला झुंझारराव पाटील व प्रा. सुरेश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तर मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून संगीतातला व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी आर. ए. कमंनगोल, राजू पाटील, आर. बी. शामाने, गीता बेडका, बाळू मगदूम व विद्यार्थी उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर क्रीडा शिक्षक एस. के. मेंडुले यांनी आभार मानले.