येळ्ळूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी बालोद्यान श्री चांगळेश्वरी लोअर व हायर प्रायमरी स्कूल आणि श्री चांगळेश्वरी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर यांनी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी बोलताना श्री. वाय. एन. मजुकर म्हणाले की, शाळेमध्ये अशा जयंत्या साजऱ्या करून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो तसेच नवीन संशोधन करण्यास चालना मिळते.
यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, संचालक नरेंद्र मजुकर, संचालिका स्नेहल मजुकर शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर सर व प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत सर त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. वाय. एन. मजूकर यांनी केले व पहिली ते दहावीपासूनच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या वैज्ञानिक वस्तूंचे व विज्ञान आकृत्या रांगोळीच्या स्वरूपात काढलेल्यांचे कौतुक केले सदर प्रदर्शनाच्या यशस्वी करण्यासाठी विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. वाय. बी. कंग्राळकर, शिक्षिका सौ. नंदा मुचंडी तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.