
बेळगाव : शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पिता आणि दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात रविवारी घडली.
कल्लाप्पा बसप्पा गानिगेर (वय 36) आणि मुलगे मनोज कल्लाप्पा गानिगेर (वय 11) आणि मदना कल्लाप्पा गानिगेर (वय 9) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राच्या शेत तलावात आपल्या मुलांना घेऊन पोहण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. सरकारी शाळेत शिक्षक असलेले कल्लाप्पा गानिगेर हे निडगुंदी गावातील हुक्केरी तोटा येथील मगदुम सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तिघांचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.
Belgaum Varta Belgaum Varta