
कोवाड : किटवाड (ता. चंदगड) येथील पाझर तलावात बेळगांव येथील एक युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. याबाबत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किटवाड धरणावर बेळगाव येथील तेरा मुले फिरण्यासाठी आली होती. दरम्यान, तलावाच्या पाण्यात त्यातील उजेब तन्वीर मुजावर (वय १७, रा. वैभवनगर बेळगाव) हा बुडाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. ही घटना आज संध्याकाळी ४ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच बेळगावरून मुलाचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले होते. त्याचबरोबीने बेळगाववरून रेस्क्यू टीम देखील दाखल झाली असून शोध मोहीम सुरु होती. पण, अंधार पडल्यामुळे उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta