बेळगाव : केंद्रीय गृहमंत्रालयाला १०१ पत्रांची मोहीम गेल्या चार दिवसापूर्वी राबविली होती, सीमाभागाच्या विविध भागातून नोंदणीकृत पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना पाठवून केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव येथील समिती कार्यकर्ते किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे आदींनी राबविलेल्या मोहिमेत एक सिमावासीय व मराठी भाषिक म्हणून आपले कर्तव्य समजून मूळ जुने बेळगाव लक्ष्मी गल्ली व सध्या दिल्ली येथील रहिवासी श्री. प्रवीण कृष्णा भोसले व त्यांच्या पत्नी सौ. आरती यांनी सुद्धा या पत्र मोहिमेत सहभाग घेतला व सीमाभागातील कन्नडसक्ती व सीमाप्रश्न सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारे पत्र या दाम्पत्याने स्वतः गृह मंत्रालयाच्या नवी दिल्ली राष्ट्रपती भवन नॉर्थ ब्लॉक (Mininstay of Home Affairs New Delhi President Of India Bhavan Narth Bolck) येथील कार्यालयात अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केले. भोसले दाम्पत्याच्या या सीमाप्रश्नी व मराठी अस्मितेविषयी असलेली निष्ठा पाहता सर्व समिती प्रेमी व मराठी प्रेमी सिमावासीयांकडून कौतुक होत आहे.