
रायबाग : सासऱ्याने जावयावर गोळीबार केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मोरब गावात घडली. ५४ वर्षीय धनपाल असंगी यांनी त्यांचा जावई ३२ वर्षीय शांतीनाथ यांच्यावर गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी मिळालेल्या रिव्हॉल्व्हरमधून त्यानी एक राऊंड फायर केला.
३० गुंठे जमिनीच्या वादातून धनपालने जावई शांतीनाथ याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन धनपालला अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta