बेळगाव : गेल्या महिन्यात डॉ. सिद्धरामप्पा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्त पद रिक्त झाले होते. त्या पदावर लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान लाडा मार्टिन मरबनियांग यांनी आज सोमवारी बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. मूळचे मेघालयचे असणारे मार्टिन यांनी 2009 साली आयपीएस अधिकारी बनल्यानंतर गुलबर्गा, यादगिर जिल्ह्याचे एसपी आणि सीआयडी बेंगलोर येथे सेवा बजावली आहे. 44 वर्षीय या तरुण आयपीएस अधिकाऱ्याने आर्ट्स मध्ये मास्टर डिग्री केली आहे. लोकसभा निवडणूक काळात लाडा मार्टिन मरबनियांग बेळगाव पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी कशाप्रकारे पार पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.