Saturday , March 7 2026
Breaking News

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी; मैदानाचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी असे निवेदन संस्थेतर्फे सचिव सुधाकर चाळके यांनी आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले.
बेळगांव हे हाॅकी प्रेमींचे माहेरघर आहे. आज जिल्ह्यात 500 हून अधिक खेळाडू हाॅकीचा नित्यनेमाने सराव करीत आहेत, परंतु ॲस्ट्रोटर्फ मैदानाची कमतरता असल्याने राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी सांगितली.
यावेळी सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष विनोद पाटील, प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील, नामदेव सावंत, केपीसीसी सदस्या आयेशा सनदी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *