Saturday , March 7 2026
Breaking News

हिंडाल्को परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन?

Spread the love

 

बेळगाव : शहरातील हिंडाल्को कारखान्याजवळ दि. 18 रोजी रात्री 10 वाजता पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पायाचे ठसे पाहिल्यानंतर ती वाघीण असल्याचे आढळून आले. वन्य प्राण्यांचे शहरात वारंवार आगमन होत असून बेळगाव शहरात गेल्या आठवड्यात गजराजाचे दर्शन झाले होते आणि आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे हिंडाल्को कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *