
बेळगाव : निराधार व्यक्तीला आधार देणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी एका बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार केले आहे. वन वन फिरून आपले जीवन काढत असणारे अनाथ वृद्धाचा मृत्यू झाला पण अंतिम संस्कार कोण करणार हा प्रश्न पडला होता. समाजसेवेची नेहमी तळमळ असणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी अंत्यसंस्कार केले. गेल्या काही दिवसापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहत असलेले वयोवृद्ध अण्णासाब चंदगड हे आजारी झाले होते. यांच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले पण त्यांनी अखेरचा श्वास सोडला. पण या मृत्यूदेहाचा अंतिम संस्कार करण्यास कोणीच पुढे आले नाही. समाजसेवेला वाहून घेतलेल्या माधुरी जाधव पाटील यांनी या मृत्यूदेहावर अंतिमसंस्कार करण्याचे ठरवून अखेर स्वतः मृत्यूदेह सदाशिव स्मशानभूमीमध्ये नेऊन अंतिमसंस्कार केले. स्वतःच्या खर्चातून अंतिम संस्कार करणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी क्षणाचा विलंब न लावता या निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार केले. त्यांच्यासोबत स्मशानभूमीमध्ये नेहमी सेवा बजावणारे शंकर इराप्पा कोलकार यांनी या अंतिम संस्कार कार्यात हातभार लावला.
यावेळी महानगरपालिका केंद्रातील संयोजक रावसाब शिरहट्टी हे समाजसेविका माधुरी जाधव याचे कौतुक करताना म्हणाले की, निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार करणारी व्यक्ती म्हटल्या तर माजी महापौर विजय मोरे यांचे नाव घेतले जाते. याच पावलावर पाऊल ठेवून पुरुषाप्रमाणे एका स्त्रीने धाडस दाखवले आहे ती म्हणजे माधुरी असेच म्हणावे लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta