बेळगाव : श्री. शांताश्रम मठ हळदिपुरची बेळगाव गोवावेस सर्कल येथील शाखा श्री. चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी येथे बुधवारी तुकाराम बीज व श्री राजाराम महाराज जन्मोत्सव मोठा चाहत साजरा करण्यात आला. सकाळी काकड आरती नंतर श्री. तुकाराम महाराजांच्या मूर्तीला व श्री. राजाराम महाराजांच्या मूर्तीला रुद्राभिषेक करून पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी भक्ती संस्कृती भजनी मंडल बापट गल्ली याच्या भजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने करण्यात आला. दुपारी ठीक 12 वाजता श्री. तुकाराम महाराज व श्री. राजाराम महाराज यांचा पाळणा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वैश्यवाणी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा भारती केसरकर, अध्यक्ष अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, वर्षा सटवानी, अश्विनी कलघटगी, पूजा मालशेट, अक्षता कलघटगी, जयश्री हणमशेठ यांनी श्री तुकाराम महाराज व श्री राजाराम महाराजांचा पाळणा म्हटला. याप्रसंगी वैश्य वाणी समाजाचे माजी अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर, अशोक मुरकुंबी, विशाल मुरकुंबी, श्याम नाकाडी, शेखर नाकाडी, सुभाष बाळेकुंद्री, सुरेंद्र मिठारी, काशिनाथ कुदळे, विजयकुमार मुरकुंबी, विकास कलघटगी, सतीश अनगोळकर, मधुसूदन किनारी, यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. चिदंबर महेश ग्रमोपाध्ये, अथर्व जोशी यांनी पुरोहितचे काम पाहिले.
यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी सर्व वैश्य समाज बांधव व भक्त जनानी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.