बेळगाव : भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगाव यांच्यातर्फे विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरमध्ये भगवान श्री विष्णू यांना आणि प्रभू राम लक्ष्मण, माता सीता यांना 1,25000 तुळशी दल अर्पण केले. नूतन वर्ष सुख, समृद्धी, समाधानाने जावो, जगावर जे संकट आले आहे ते मुक्त व्हावे याकरिता केंद्राचे अध्यक्ष श्री. गणेश धोत्रे (गिरीवर प्रभुजी) यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. याची सुरुवात गोमाता पूजनाने केली. यावेळी विधीनुसार गो मातेचे पूजन करून गो मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर रवी जोशी प्रभुजी यांनी गोपाल सहस्त्रनाम म्हणून तुळशी पूजनला सुरुवात केली श्री गणेश धोत्रे यांच्या हस्ते शालिग्राम पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले समाजसेविका माधुरी जाधव पाटील, राजमोहन प्रभू, राम गोपाल प्रभू, श्रीनिवास प्रभू, व उपस्थित भक्तांच्या हस्ते तुळशी पूजन व किर्तन करण्यात आले. यानंतर केंद्रातर्फे भक्तांच्या करिता प्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी साडेतीनशे भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाकरिता विशेष सेवा केलेले विष्णू गल्ली येथील मंजुनाथ सूर्यवंशी, रघु कंग्राळकर, बडीगेर, आपटेकर व सर्व भक्त मंडळी यांनी विशेष सेवा करून हा कार्यक्रम चांगल्यारित्या पार पाडला. याकरिता केंद्रातर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
Check Also
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …