Tuesday , February 27 2024
Breaking News

चंदगड तालुक्यावर झालेला अन्याय दूर करणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

यशवंतनगर येथे केडीसीसीचा प्रचार मेळावा संपन्न

तेऊरवाडी (एस. के. पाटील) :
चंदगडच्या लाल मातिचा सुगंध कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला येतो. गेल्या काही निवडणूकात चंदगड तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय आगामी काही दिवसात दूर करून चंदगडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहाणार असल्याचे विचार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रचारानिमित्य यशवंतनगर (ता. चंदगड ) येथे आमदार राजेश पाटील व छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून आयोजित प्रचार सभेत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील होते.
हसन मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, चंदगडचे राजकारण मेहूण्या पाहूण्यांचे आहे. ते कधी जवळ येतील याचा नेम नाही. केडीसी बँक १५० कोटींच्या नफ्यात आहे. सलग दोन वर्ष १८- १८ कोटी रूपयांचा इन्कम टॅक्स भरणारी देशातील पहिलिच बॅंक आहे. काटकसरीने कारभार केल्याने बँक नफ्यात आहे. महामंडळांच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना कर्जपुरवठा केला आहे. शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात येत असून खावटी कर्ज व्याजही कमी केले आहे. या निवडणूकीत विरोधकानी इतर पक्षातील उमेदवार आयात केले असल्याने आमचाच विजय निश्चित आहे.
गृहराज्यमंत्री तथा कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील बोलताना म्हणाले, राजकारण बदलत असले तरी ग्रामिण जनतेच्या विकासाची ही मंदिरे तेवत ठेवली पाहिजेत. बँकेवर चिखलफेक होऊ नये, बँकेच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ती लादली गेली. पॅनेलला निवडून द्या, विकासाला मागे पडणार नाही. निधी वाटप व विकासात चंदगडला झकतं माप नेहमिच असेल.
प्रास्ताविक करताना आमदार राजेश पाटील म्हणाले, कोरोना काळातही २०० कोटींची विकासकामे मतदार संघात केली. माझे मेहुणे विरोधी पॅनलमध्ये असले तरी येथील मतदार नातीगोती न पाहता मतदान करतील. एकमेकांचे पाय ओढण्यात आणि टांग मारण्यात आपण आपलेच मोठे नुकसान करून घेतले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन करतानाच संग्रामसिंह कुपेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, पालकमंत्री सतेज पाटील यानी जि. प. सदस्याप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. चंदगड तालुक्यातील सर्व सभासद सत्ताधारी शाहू शेतकरी विकास आघाडीलाच मतदान करतील असा विश्वास दिला.
यावेळी गोपाळराव पाटील, संग्राम कुपेकर, भरमूअण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मनोगते व्यक्त केली.
प्रारंभी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या प्रचार मेळाव्याला, जि. प. सदस्य अरुण सुतार, कल्लाप्पा भोगण, सचिन बल्लाळ, गडहिंग्लज राष्ट्रवादी अध्यक्ष रामाप्पा करिगार, विक्रम चव्हाण, गोकुळ चेअरमन विश्वास पाटील, दिपक पाटील, सौ. ज्योती पाटील, आमदार राजू आवळे, एम. जे. पाटील, यशवंत सोनार, भैया माने, संभाजीराव देसाई, मोहन परब, उमेदवार मदन कारंडे, विजय सिंह माने, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर यांच्यासह मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डोंगराळ व दुर्गम चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love  चंदगड येथील विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण कोल्हापूर (जिमाका) : चंदगडच्या विकासासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *