खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात दर रविवारी आठवडीचा बाजार भरतो. या आठवडी बाजाराला तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातील नागरीक हजेरी लावतात. खानापूर शहरातील पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर मिरचीचा बाजार भरतो. मात्र या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ नेहमी गजबजलेली असते. त्यामुळे पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन याचा त्रास सर्वानाच होतो.
यासाठी खानापूर नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन खानापूरच्या आठवडी बाजाराची व्यवस्था दुसरीकडे करणे गरजेची आहे.
जोपर्यंत नगरपंचायत पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावरील मिरचीचा बाजार अन्यत्र हालविणार नाही तो पर्यंत वाहतुकीची कोंडी सुटणार नाही.
पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता
खानापूरात दर रविवारी आठवड्याचा बाजार भरतो. मात्र पारिश्वाड-जांबोटी रस्त्यावर मिरचीच्या बाजारात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघात होऊन कोणाच तरी जीव जाण्याचा प्रसंग ओडवणार यासाठी खानापूर नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन आठवड्याच्या बाजाराची व्यवस्था अन्यत्र सोय करावी, अशी मागणी खानापूर शहरवासीयांतुन होत आहे. गेली कित्येक वर्षे याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र मागणी अद्याप पूर्ण झाली नाही.