बेळगाव : बेळगावातील बीम्स हॉस्पिटल आणि बीम्स संस्थेतर्फे आज शहरात मतदान जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एक मत ही देशाच्या विकासाची नांदी आहे. मतदान ही लोकशाहीत संधी आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतमतदानापासून वंचित राहू नये यासाठी बेळगाव बीम्स हॉस्पिटलच्या वतीने जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जथ्याला निशाण दाखवून चालना दिली. यावेळी मतदारांत मतदान करण्याविषयी जागृती करण्यात आली.
यावेळी बीम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, बीम्स हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरण्णा पल्लेद, डिस्ट्रिक्ट सर्जन डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. पुष्पा एमजी, डॉ. ए. बी. पाटील, शिल्पा वाली, प्रकाश कोडली, नामदेव माळगी व बीम्स कर्मचारी, नर्सिंगचे विध्यार्थी सहभागी झाले होते.