Friday , September 20 2024
Breaking News

घरगुती वापरासाठीच्या विज दरात प्रति युनिट १.१० रुपये कपात

Spread the love

 

आजपासून प्रभावी; १५ वर्षात प्रथमच वीज दरात कपात

बंगळूर : राज्यात पंधरा वर्षांनंतर प्रथमच वीज वापर दरात कपात करण्यात आली आहे. दर कपात आजपासून लागू होणार असून मे महिन्यात देण्यात येणाऱ्या बिलाना ती लागू होणार आहे.
कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये वार्षिक कार्यवाही केली आणि एस्कॉमचे प्रस्ताव, लोकांचे मत आणि २२ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, घरगुती वीजेवर १ रु. १० पैशांची कपात होणार आहे.
पूर्वी १ ते १०० युनिटपर्यंत घरगुती विजेचे दर चार रुपयांपेक्षा जास्त होते. १०० युनिटपेक्षा अधीक वीज वापरावर प्रति युनिट सात रुपये दर होता. गृहज्योती योजना लागू असल्याने २०० युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा फटका बसला नाही. मात्र गृहज्योती परिक्षेत्राबाहेर गेलेल्या ग्राहकांना विजेचा धक्का बसला होता.
यावेळी झालेल्या सुनावणीत एस्कॉमने २०२४-२५ या वर्षासाठी ६९,४७४.७५ कोटी रुपयांची वार्षिक महसुलाची आवश्यकता प्रस्तावित केली. यामुळे ४,८६३.८५ कोटी रुपयांचा महसूल कमी झाला. त्याची भरपाई करण्यासाठी त्यांनी वीजदरात सरासरी ६६ पैशांनी ४९ वरून १६३ पैसे प्रति युनिट वाढ करण्याची विनंती केली. परंतु कर्नाटक विद्युत आयोगाने ६४,९४४.५४ कोटी रुपयांच्या महसुलाची आवश्यकता मंजूर केली आहे.
यातून २९०.७६ कोटी रुपये महसुलात वाढ प्रस्तावित आहे. त्याआधारे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, पाटबंधारे, अपार्टमेंट, औद्योगिक प्लांट अशा विविध पातळ्यांवर वापरल्या जाणाऱ्या विजेचे दर कमी करण्यात आले आहेत.
लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी दर कमी केल्यामुळे प्रति युनिट ५० पैसे सवलत सुरू ठेवली जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण प्रवर्गाच्या विलीनीकरणाच्या निर्णयात सुधारणा करण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग, खासगी रुग्णालये आणि ग्रामपंचायत अंतर्गत खासगी शैक्षणिक संस्थांसाठी प्रति युनिट ३० पैसे सवलत मंजूर करण्यात आली आहे.
केईआरसीने म्हटले आहे, की अक्षय ऊर्जा स्त्रोतांकडून खरेदी केलेल्या विजेच्या प्रति युनिट ५० पैसे जास्त दर चालू ठेवण्यात आला आहे. एक एप्रीलपासून प्रीपेमेंट मीटर मंजूर करण्यासाठी आवश्यक व्यवस्था विहित करेल. एक जूनपासून, एलटी ग्राहकांना ऑटो मीटर रीडिंग सक्षम करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रति युनिट दर कपात
एलटी घरगुती वापरासाठी – १.१० रुपये
एचपी वाणिज्य – १.२५ रुपये
एचटी उद्योग ५० पैसे
एचटी हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था ४० पैसे
खासगी सिंचन २ रुपये
खासगी रुग्णालय, शैक्षणिक संस्था ५० पैसे
औद्योगिक आस्थापने १ रुपयांचा
वाणिज्य अस्थापने ५० पैसे
अपार्टमेंटसह वाणिज्य, उद्योग, खासगी रुग्णालये व शिक्षण संस्थांचे मागणी शुल्क प्रति किलोवॅट १० रुपये कमी करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न

Spread the love  खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *