
बेळगाव : आगामी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आज शुक्रवार दिनांक ५/४/२०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ज्येष्ठ नेते महादेव तुकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला. मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांनी अर्ज स्वीकारला.
यावेळी रणजित चव्हाण पाटील, गुणवंत पाटील, रामचंद्र मोदगेकर, दत्ता जाधव, सागर पाटील, रणजित हावळानाचे, उमेश पाटील, प्रशांत भातकांडे, मोतेश बारदेसकर, शिवानी पाटील, साधना पाटील, ज्ञानेश्वर मन्नूरकर, विकास कलघटगी, श्रीधर जाधव, बाबली महाराज आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta