बेळगाव : खवय्यांना एकाच छताखाली देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकत्रित चवं चाखता यावी, यादृष्टीकोनातून बेळगाव नेहरूनगर येथील ‘फूड पार्कने’ स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांसह पुनरागमन केले आहे. याबाबत शनिवार (दि. ६ एप्रिल) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल रायबागी आणि ध्रुव पटेल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत ‘फूड पार्क’ या अभिनव संकल्पनेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, मेट्रोसिटीच्या धर्तीवर बेळगावमध्येही खव्वय्यांसाठी विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची रेलचेल सुरु असल्याने या ‘फूड पार्क’ची उभारणी करण्यात आली आहे.
फूडपार्कची वैशिष्ट्ये
शहराच्या मध्यभागी नेहरू नगर येथे उभारण्यात आलेल्या विस्तृत जागेतील फूडपार्कमधील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहेत. गरम पिझ्झा ते स्वादिष्ट चायनीज पदार्थ आणि माऊथ वॉटरिंग कबाब या खाद्यपदार्थांची त्यात भर पडली आहे. खाद्यप्रेमींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी बनविण्यात येणारे सर्व पदार्थ हे ताजे आणि अतिशय उत्कृष्ट असतात, तसेच स्वच्छता आणि खाद्यप्रेमींची पसंद लक्षात घेऊनच बनविण्यात येतात. फूड पार्क हे केवळ अन्नच नाही तर ते कायमस्वरूपी आठवणी निर्माण करेल असे स्थान आहे. कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळींसह याठिकाणी जमून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो. केवळ खाद्यपदार्थच नाही तर प्रत्येकाचे मनोरंजदेखील याठिकाणी व्हावे या उद्देशाने फूड पार्कची संकल्पना अंमलात आणली आहे. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देण्यासह भारतीय खाद्य संस्कृती प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तोंडात रेंगाळणाऱ्या चवीचे पदार्थ खाद्यप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या विलक्षण अनुभवाचा आनंद घेण्यासाठी बेळगावकरांनी “फूड पार्क”ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन राहुल रायबागी यांनी केले.
या पत्रकार परिषदेला कनव सुरी आणि खलील गर्ग उपस्थित होते.