बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक मंगळवार दिनांक ९/४/२०२४ रोजी श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव होते.
९ मे रोजी पारंपरिक शिवजयंती व ११ मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी मोठ्या उत्साहात हा शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
९ मे रोजी सकाळी शहापूर महामंडळाच्या वतीने छ. शिवाजी महाराज उद्यान येथे सकाळी ९.३० वाजता छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व शिवज्योतीचे स्वागत करण्यात येईल. तर दिनांक ११ मे रोजी बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे व्यासपीठ उभारून सर्व चीत्ररथांचे स्वागत करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष नेताजी जाधव यांनी सालाबादप्रमाणे परंपरेनुसार शहापूर, वडगाव भागातील शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवजयंती उत्साहात साजरी करावी व काही अडचणी आल्यास महामंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी रणजित हावळनाचे, माजी उपमहापौर संजय शिंदे, राजकुमार बोकडे, पी. जे. घाडी, प्रकाश हेब्बाजी, माजी नगरसेवक विजय भोसले, ज्ञानेश्वर मन्नूरकर, आदींनी मनोगत व्यक्त केले.
सचिव श्रीकांत कदम यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.
यावेळी शहापूर महामंडळाचे पदाधिकारी हिरालाल चव्हाण, दिलीप दळवी, शिगेहळीकर, शाहू शिंदे, ओम दळवी, विजय धम, राजाराम सूर्यवंशी, सुरज लाड, शिवकुमार मनवाडकर, श्रीधर जाधव, मंगेश नागोजीचे, मारुती भाकोजी आदी उपस्थित होते.