
बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांच्या हिंदवाडी येथील निवासस्थानासमोर निदर्शने केली.
स्वत:ला परंपरावादी आणि महिलांचे रक्षण करणारा भाजप पक्ष म्हणवून घेणारे माजी आमदार संजय पाटील यांनी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बोलणे निंदनीय असल्याचे सांगत संजय पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला.
पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांचे एकही म्हणणे न ऐकणाऱ्या आंदोलक महिलांनी माजी आमदार संजय पाटील यांच्यावर ‘पुरुष असेल तर बाहेर यावे लपून का बसावे’, असा टोला लगावला. परिस्थिती लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती मिटवली. त्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या संजय पाटील यांनी जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आग्रह धरत उपोषण सुरूच ठेवले.
Belgaum Varta Belgaum Varta