बेळगाव : मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी जीवाचे रान करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा जाहीर सभा बेळगाव येथे मंगळवार दिनांक 30 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृतीची अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा येथून या अभियानाची सुरुवात करण्यात येतील करण्यात आली.
हलगा, बस्तवाड, वाघवडे संतीबस्तवाड या गावांमध्ये अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी, नागरिकांनी, महिलांनी, बालगोपालनी, आजी-माजी लोकप्रतिनिधी या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृती अभियानामध्ये सकल मराठा समाजाचे नेते माजी आमदार मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील, मनोहर संताजी, प्रदीप सुतार आदींनी या अभियानामध्ये भाग घेतला.
हलगा गावांमध्ये ऍड. अण्णासाहेब घोरपडे, प्रकाश हेब्बाजी, सागर बिळगोजी, ज्योतिबा हनमंताचे, रामा कानोजी, बस्तवाड गावामध्ये मनोहर काकतकर, तुकाराम मन्नोळकर, हनमंत बांडगी, संतोष बांडगी, विठ्ठल पाटील, वाघवडे गावांमध्ये माजी एपीएमसी सदस आर के पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक ज्योतिबा आंबेळकर, दीपक आंबोळकर, नागेश आंबोळकर, ज्योतिबा होनगेकर, ऋतिक पाटील, राजू लोहार, परशुराम पाटील, गजानन आंबोळकर, उदय पाटील, संतीबस्तवाड गावामध्ये ऍड. प्रसाद सडेकर, महादेव बिर्जे, मेघो बिर्जे, निंगाप्पा मेलगे, सातेरी माईनकर बाळाराम पाटील, भरमा दावतार, राजू पावशे आदि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.