येळ्ळूर : येळ्ळूर येथील ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार (ता. 29) पासून सुरू होत आहे. यात्रोत्सव सोमवार पासून ते गुरुवार पर्यंत सलग चार दिवस चालणार आहे
सोमवार (ता. 29) रोजी आंबील गाड्यांनी यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे. तर मंगळवार (ता. 30) रोजी पहिल्यांदा श्री कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे, तर सायंकाळी सहा वाजता ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर मोठ्या उत्साहात इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक हा इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असतात. तर बुधवार( ता. 1) रोजी महालक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा होणार आहे. तर गुरुवार (ता. 2) रोजी येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.